श्री मौनी महाराज
श्री मौनी महाराज मौनी महाराज : (सु. सतरावे शतक). एक शिवकालीन महाराष्ट्रीय सत्पुरुष, मौनी मठाचे प्रवेशद्वार मौनी महाराज पाटगांव येथे आल्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून त्यांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांना ‘मौनी’ हे नाव मिळाले. त्यांना मौनी बाबा वा मौनी बुवा असेही म्हणत. ते उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या गावाहून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव (ता. भुदरगड) या गावी वास्तव्य करून राहिले. मौनी महाराज मठ पाटगांव (सभा मंडप ) मौनी बाबांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांच्या मठातील जीवनक्रम नाथपंथांपैकी अवधूत उपपंथाशी काहीसा मिळता-जुळता होता. गोसाव्यांच्या ‘गिरी’ नावाच्या पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही संभव आहे. सभा मंडपातील आतील भाग मौनी महाराज कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. त्यांच्या कीर्तनातून वेदवाणी व्यक्त होत असल्यामुळे धर्ममार्तंडांनी तुकारामांप्रमाणेच त्यांचा फार छळ केला. सहभागी तरुण कार्यक्रते मौनी बाबांची तुकाराम व रामदास यांच्याशी ओळख होती श...